बॅंक घोटाळा करणाऱ्याला इंटरपोलच्या मदतीने अटक

नवी दिल्ली: एका अहमदाबादस्थित कंपनीचा प्रमुख सुनील कक्कड याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. कोट्यवधी रूपयांच्या बॅंक घोटाळ्याशी निगडीत मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती कारवाई करताना इंटरपोलची मदत घेण्यात आली. कक्कडवर 800 कोटी रूपयांहून अधिक रकमेचा बॅंक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

तपास यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने दुबईमागे लायबेरियाला पलायन केले. तिथे त्याला इंटरपोलच्या मदतीने पकडण्यात आले. कक्कड याला भारतात परत आणले गेले. त्याने कुटूंबातील इतर सदस्यांना आधीच अमेरिकेला पाठवले असल्याचे समजते. अनियमित स्वरूपाचे व्यवहार करण्यासाठी त्याने बनावट कंपन्यांचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर केला. सीबीआयने 2015 मध्ये कक्कड याच्याविरोधात बॅंक घोटाळ्याबद्दल गुन्हा दाखल केला. त्याची दखल घेऊन ईडीने मागील वर्षी मनी लॉण्डरिंग प्रकरणी गुन्हा नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)