नवी दिल्ली – बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने 16 डिसेंबर आणि 17 डिसेंबर रोजी संप करण्याचे ठरविले आहे. दोन सरकारी बॅंकांचे खासगीकरण करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याला विरोध म्हणून हा संप करण्यात येणार असल्याचे युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन या संघटनेने म्हटले आहे.
दोन बॅंकांच्या खासगीकरणाच्या संदर्भातील विधेयक सध्याच्या अधिवेशनात संसदेत मांडण्यात येणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशात जनतेच्या ठेवी मोठ्या प्रमाणात सरकारी बॅंकांत असतात. त्यामुळे या ठेवीचा सदुपयोग करण्यासाठी सरकारी बॅंकांची आवश्यकता आहे. मात्र केंद्र सरकार खासगीकरण करीत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.