नवी दिल्ली: नवीन वर्षात बँकिंग क्षेत्रातील प्रमुख संघटना संपावर जाण्याची तयारी करत आहेत. बँकिंग क्षेत्रातील प्रमुख संघटनांनी ८ जानेवारी २०२० रोजी केंद्रीय कामगार संघटनांद्वारे आयोजित संपात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियन (एआयबीईए)च्या नेत्याने ही माहिती दिली. बँकांच्या कर्मचाऱ्यांचा संप झाल्यास ग्राहकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, देशभरात सर्वसाधारण संपाला १० केंद्रीय कामगार संघटना पाठिंबा आहे. व्यंकटचलम यांच्या म्हणण्यानुसार, हा संप केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात काढला जाईल, ज्यामध्ये रोजगार सुरक्षा, नोकर भरती, कामगार कायद्यांमधील दुरुस्ती थांबवण्यासाठी मागण्या केल्या जातील.
वेंकटाचलम म्हणाले की या संपात सामील झालेल्या बँकिंग क्षेत्राशी संबंधित प्रमुख संघटना एआयबीईए, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ आणि आयएनबीओसी असतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) कर्मचारीही संपामध्ये सामील होतील असा दावा व्यंकटचलम यांनी केला आहे. याशिवाय सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक (आरआरबी), भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) आणि जनरल विमा क्षेत्रातील कर्मचार्यांनीही या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. वेगवेगळ्या कर्मचारी संघटना बँका विलीन करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करीत आहेत.
तीन महिन्यांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १० बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली. यानंतर नवीन बँका अस्तित्वात येतील. आंध्र बँक, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यापुढे अस्तित्त्वात राहणार नाही. या विलीनीकरणामुळे बँकिंग क्षेत्रात निकऱ्या कमी होतील अशी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.