बारामती -पुलाच्या गार्ड स्टोनला दुचाकी धडकून संतोष दशरथ कांबळे (वय 38, रा. पंचशीलनगर, कसबा, बारामती) या बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 3) सकाळी पावणेदहा वाजता मोरगावजवळ खटकळीचा ओढा येथे ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले संतोष हे बारामतीतील दिवंगत पत्रकार महेंद्र कांबळे यांचे कनिष्ठ बंधू होते.
संतोष कांबळे हे आयसीआयसीआय बॅंकेच्या मुर्टी शाखेत कार्यरत आहेत. शुक्रवारी ते बारामतीतून मुर्टीला दुचाकीवरुन निघाले. मोरगाव – नीरा रस्त्यावर मोरगावच्या पुढे दीड किलोमीटर अंतरावर त्यांची दुचाकी (एमएच 03 एवाय 8021) पुलाच्या गार्ड स्टोनला धडकली.
यात बाजूला फेकले जाऊन डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. वडगावचे पोलीस उपनिरीक्षक राजाराम साळुंके, हवालदार संजय मोहिते, माजी सरपंच पोपटराव तावरे, दादा नेवसे आदींनी त्यांना उपचारासाठी हलवले.