बॅंकेवरील आरोप राजकीय द्वेषातून

ऍड. मूलचंदानी यांचे स्पष्टीकरण : बॅंकेत अपहार नसल्याचा दावा

पिंपरी – दि सेवा विकास सहकारी बॅंकेचे सर्व कामकाज नियमानुसार चालू आहे. बॅंकेच्या कामकाजात कोणतीही अनियमितता नसून बॅंकेत अपहार झाला नाही, बॅंकेवर करण्यात आलेले आरोप हे केवळ राजकीय द्वेष आणि सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या बॅंकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले असल्याचा दावा बॅंकेचे अध्यक्ष ऍड. अमर मूलचंदानी यांनी केला आहे. शुक्रवारी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन
आरोपांचे खंडन केले.

ऍड. मूलचंदानी म्हणाले, बॅंकेने आरबीआयच्या परिपत्रकीय निर्देशांचे उल्लंघन केलेले नाही. आरबीआयच्या नियमाप्रमाणे 2010 ते 2019 या कालावधीत सहा वेळा बॅंकेचे लेखापरीक्षणही झाले आहे. त्यामध्ये बॅंकेत अनियमितता आढळून आलेली नाही. बॅंकेवर आरोप करणारे धनराज आसवाणी आणि त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांनी मिळून आजपर्यंत बॅंकेविरुद्ध 37 केसेस पुणे आणि मुंबई न्यायालयात दाखल केल्या होत्या.

बॅंकेच्या बाजूने या केसेसचा निकाल लागला असून सर्व तक्रारी निकाली निघाल्या आहेत. तक्रारदार आसवाणी यांनी पोलीस तक्रारीत 104 खात्यांमध्ये 238 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. वास्तवात 104 कर्ज खात्यांपैकी विविध कर्जखात्यात 66 कोटी 17 लाख रुपये वसूल झाले आहेत. तर, उर्वरित खात्यांच्या वसुलीची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. धनराज आसवाणी राजकीय द्वेषातून बॅंकेची बदनामी करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

न्यायप्रविष्ट प्रकरणाची सहनिंबधकांनी माहिती दिली

ऍड. मूलचंदानी यांनी सांगितले की, 14 फेब्रुवारी 2019 रोजी सहकार आयुक्तांनी सहनिबंधक राजेश जाधवर यांना बॅंकेचे लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बॅंकेचे संचालक नरेंद्र ब्राह्मणकर यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे रिट-पिटिशन दाखल केली होती. या सुनावणीत काही मुद्यांवर मनाई हुकूम होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही सहनिबंधक जाधवर यांनी आसवाणी यांना माहिती अधिकाराच्या अर्जावर बॅंकेच्या कर्ज खात्यांची माहिती, कागदपत्रे दिली. हे नियमाचे उल्लंघन आहे. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)