ढाका : भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने बांगलादेश आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले. लक्ष्य सेनचे यंदाच्या मोसमातील हे पाचवे विजेतेपद ठरले.
Lakshya prevails in 🇧🇩!
No1 seeded @lakshya_sen emerged Champion at the #BangladeshInternationalChallenge as he defeated Leong Jun Hao of 🇲🇾 2⃣2⃣-2⃣0⃣; 2⃣1⃣-1⃣8⃣ in the finals to lift the trophy! Incredible Lakshya. Keep soaring!👏🚀#IndiaontheRise#badminton #LakshyaSen pic.twitter.com/PE7JUezEkC
— BAI Media (@BAI_Media) December 15, 2019
स्पर्धेतील अंतिम लढतीत अव्वल मानांकित लक्ष्यने मलेशियाच्या लिआँग जून हाओचा २२-२०, २१-१८ असा पराभव केला. ही लढत ५० मिनिटे चालली.
दुसरीकडे महिला दुहेरीत मनीषा के- त्रतूपर्णा पांडा यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत मलेशियाच्या ‘टॅन पर्ली कूंग ली-तिनाह मुरलीधरन’ यांनी त्यांच्यावर २२-२०, २१-१९ अशी मात केली.