बीएसएफच्या कारवाईत बांगलादेशच्या तस्कराचा मृत्यू

कोलकाता – बांगलादेशच्या सीमेवरून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या तस्कराचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने आज हाणून पाडला. ‘बीएसएफ’च्या जवानांनी केलेल्या गोळीबारात हा तस्कर ठार झाला, बीएसएफच्यावतीने ही माहिती देण्यात आली. 

या तस्कराने सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये या जवानाच्या कानाला किरकोळ दुखापत झाली होती. त्यानंतर ‘बीएसएफ’च्या जवानांनी केलेल्या गोळीबारात हा तस्कर ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री 10 च्या सुमारास घडली.

‘बीएसएफ’ची तुकडी माल्दा जिल्ह्यातील गोपालनगर चौकीजवळ गस्त घालत असताना हा प्रकार घडला. सीमेजवळील कुंपणाजवळ 10-12 बांगलादेशी आणि भारतीय तस्करांच्या हालचाली आढळून आल्या. त्यांना थांबण्याचा इशारा केल्यावर जवळील फेन्सेडिल कफ सिरपच्या बाटल्या कुंपणात फेकून देऊन त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

या बाटल्या कुंपणात अडकून पडल्यावर बांगलादेशच्या काही जणांनी त्या काढून घेण्याचा प्रयत्न केला. पळून जाणाऱ्या काही जणांपैकी एकाने ‘बीएसएफ’च्या जवानावर हल्ला केला. आत्मरक्षणासाठी जवानाने केलेल्या गोळीबारात हा तस्कर ठार झाला. घटनास्थळावरून फेन्सेडिल कफ सिरपच्या 75 बाटल्या आणि धारदार दहा शस्त्र सापडले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.