डबलिन (आयर्लंड ) – आयर्लंड येथे सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत वेस्टइंडीज आणि बांगलादेश यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने वेस्टइंडिजवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळविला आहे. वेस्टइंडिजने दिलेले 262 धावांचे आव्हान बांगलादेशने 30 चेंडू आणि 8 गडी राखून पूर्ण केले.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 50 षटकांत 9 बाद 261 धावांची मजल मारून बांगलादेशसमोर विजयासाठी 262 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशने हे आव्हान 45 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 264 धावा करत पूर्ण केलं.
Bangladesh beat West Indies by eight wickets!
What a batting performance from their top three, with each of Soumya Sarkar, Tamim Iqbal and Shakib Al Hasan passing fifty!#WIvBAN SCORE ➡️ https://t.co/yJdQgICJI0 pic.twitter.com/ZOdKnPIPgq
— ICC (@ICC) May 7, 2019
बांगलादेशकडून सलामीवीर तमीम इकबाल आणि सौम्य सरकार यांनी पहिल्या विकेटसाठी 144 धावांची भागिदारी करत विजयाचा पाया रचला. इकबालने 80 तर सरकारने 73 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या शाकिब अल हसन याने नाबाद 61 आणि मुशाफिकुर रहीमने नाबाद 32 धावा करत संघास विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत राॅसटन चेज आणि शैनन गेब्रिएलने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी वेस्ट इंडिजकडून फलंदाजीत शाइ होपने 132 चेंडूत सर्वाधिक 109 धावा केल्या तर रॉसटन चेज़ने 51 आणि सुनील अम्ब्रिसने 38 धावा केल्या. शाइ होपची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आजचे 6 वे शतक ठरले. बांगलादेश संघाकडून गोलंदाजीत मशरफे मोर्तज़ाने 10 षटकांत 49 धावा देत 3 गडी बाद केले. तर मोहम्मद सैफुद्दीन आणि मुस्तफ़िज़ुर रहमान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
Bangladesh won by 8 wickets against @windiescricket in the second match of Walton ODI Tri-Series 2019.#BANvWIN #RiseOfTheTigers pic.twitter.com/sJUX2KsbTv
— Bangladesh Cricket (@BCBtigers) May 7, 2019
दरम्यान, वेस्टइंडीज आणि बांगलादेश हे संघ आयर्लंड दौऱ्यावर असून आयर्लंड, बांगलादेश आणि वेस्ट इंडीजदरम्यान तिरंगी वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने आयर्लंडचा 196 धावांनी पराभव केला आहे.