बांगलादेश शोधणार फेसबुक, व्हॉटस ऍपला पर्याय

ढाका  – फेसबुक आणि व्हॉटस ऍपला पर्याय म्हणून “जोगाजोग’ नावाचा सोशल मिडीया प्लॅटफॉर्म विकसित केला जात असल्याचे बांगलादेशने म्हटले आहे. 

शनिवारी महिला ई-कॉमर्स विषयक एका आभासी संमेलनाला संबोधित करताना माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जुनाईद अहमद पलक यांनी ही माहिती दिली. सोशल मिडयाच्या क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म विकसित केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतःच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्ममुळे स्थानिक उद्योजकांना माहिती आणि डाटाच्या शेअरिंगसाठी बाजारात स्वतःचे स्थान निर्माण करता येऊ शकेल. त्यांना कोणत्याही विदेशी प्लॅटफॉर्मवर अवलंबून रहावे लागणार नाही. व्हॉट्‌स ऍपला पर्याय म्हणून सरकार “अलापन’ नावाचे एक ऍप विकसित करण्याचेही काम करीत आहो, असेही त्यांनी सांगितले.

देशातील जाहिरातींमुळे होणाऱ्या पैशांचा मोठा ओघ देशाबाहेर जाणे थांबावा यासाठी युट्यूबचा पर्याय म्हणून एक स्ट्रिमिंग ऍप विकसित करण्याचीही सरकारची योजना आहे, असेही पलक यांनी सांगितले.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.