#ICCWorldCup2019 : विजयीलय कायम राखण्यास बांगलादेश उत्सुक

स्थळ – साऊदॅम्प्टन
वेळ – दुपारी 6.00 वा.

लंडन – बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला धुळ चारल्यानंतर बांगलादेशचा संघ स्पर्धेतील आपला विजयरथ राखण्यासाठी उत्सुक झाला आहे. त्यांच्यासमोर आजच्या सामन्यात न्यूझीलंडचे कडवे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवायाचा असल्यास बांगलादेशच्या संघातील शाकिब अल हसनला उत्कृष्ट कामगिरी करण्याची गरज आहे.

शकिबने आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात 75 धावा केल्या होत्या. तर, त्याने एक गडी देखील बाद करत आपल्या अष्टपैलू कामगिरीची झलक दाखवून दिली होती. याच बरोबर शाकिब हा एक दिवसीय आंतरराष्ट्रिय सामन्यांमध्ये अडीचशे बळि व पाच हजार धावा करणारा पाचवा खेळाडु ठरला आहे. यापुर्वी श्रीलंकेचा सनथ जयसुर्य, आफ्रीकेचा जॅक कॅलीस, पाकिस्तानचे शाहिद आफ्रिदी व अब्दुल रझाक यांनी ही कामगिरी केली आहे. ओव्हल येथे होणाऱ्या सामन्यात त्याच्याकडुन मोठ्या अपेक्षा आहेत.

यापुर्वीद्‌च्या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने श्रीलंकेवर दहा गडी राखुन मात करत आपल्या आभियानाची विजयी सुरूवात केली होती. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेशने न्युझीलंडला पाच गडी राखुन पराभवाचा धक्का दिला होता. या सामन्यात शकीब याने महत्वाची कामगिरी केली होती. तर, विश्‍वचषकापुर्वी झालेल्या नुझीलंडविरुध्दच्या मालिकेत त्याला बोटाच्या दुखापतिमुळे खेळता आले नव्हते. या मालिकेत बांगलादेशचा संघ तीनही सामन्यांमध्ये पराभुत झाला होता.

आफ्रीकेविरुध्द्‌ बांगलादेशच्या खेळाडुनी सांघिक कौशल्या दाखविले होते. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांचा संघ उत्सुक झाला आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात त्यांच्याकडुन चिवट लढतीची अपेक्षा आहे. सामन्यापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शकीब याने सांगितले की, विश्‍वचषक स्पर्धेसाठी संघाची बांधणी करताना आम्हाला मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत याची मानसिकता आम्ही केली आहे.

आफ्रीकेविरुध्द्‌च्या विजयामुळे आमचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. अशीच कामगिरी आम्हाला पुढे करावयाची आहे. संघातील सर्वच सहकारी सर्वोत्तम कामगिरी करण्याकरिता तयार आहेत. एक दिवसीय दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांमध्ये खेळणार शकीब हा बांगलादेशाचा तिसरा खेळाडु आहे. याधी कर्णधार मशरफे मुर्तझा व मुश्‍फिकुर रहीम यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांनी अनुक्रमे 210 व 206 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यासंदर्भात बोलताना शकीब म्हणाला, मी कधीच आकडेवारीकडे पाहत नाही. मात्र जर लोक माझ्याबद्दल कौतुकाने बोलत असतील तर निश्‍चितपणे मला प्रेरणा मिळते.

न्यूझीलंडकडुन मॅट हेन्‍री हा गोलंदाजीत चांगली कामगिरी करील अशी अपेक्षा आहे. सलामीची जोडी कालीन मुन्‍रो व मार्टिन गुप्तील यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. त्यांनी लंकेविरुध्द्‌ 16.1 षटकांत 137 धावा केल्या होत्या. 2015 च्या विश्‍वचषक स्पर्धेत न्युझीलंडने उपविजेतेपद मिळविले होते. सामन्यापुर्वी बोलताना गुप्टिल म्हणाला की, बांगलादेशास आम्ही दुबळे मानणार नाही. त्यांच्याविरुध्द फाजील आत्मविश्‍वास न ठेवता शेवटपर्यत झुन्ज देण्यासाठी आम्ही तयार आहोत. पहिल्या दहा षटकांमध्ये धावा रोखण्यावर आम्ही भर देणार आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.