Bangladesh violence – बांगलादेशातील सध्याची स्थिती जवळपास सामान्य झाली आहे. मात्र अजूनही काही मोठी आव्हाने कायम आहेत, असे हंगामी सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटले आहे. अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारांचे माध्यम सचिव शफीकुल आलम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टिप्पणी केली.
बांगलादेशातील सध्याची स्थिती कशी आहे, असे विचारल्यावर मुख्य सल्लागारडॉ. महम्मद युनूस यांनी विदेशी पत्रकारांना देशातील परिस्थितीचे अवलोकन करण्यास आमंत्रित केल्याचे आलम म्हणाले. तुम्ही ग्रामीण भाग, राजधानी ढाक्याबाहेरील शहरे किंवा औद्योगिक क्षेत्र अशा सर्व ठिकाणी भेट द्यावी आणि तुम्ही स्वतः परिस्थिती पहावी. ही स्थिती सामान्य आहे की नाही याचा निर्णय स्वतःच घ्यावा, असेही त्यांनी सुचवले.
देशातील स्थिती सामान्य होते आहे. सर्व पोलीस स्थानके आता पूर्वत सुरू झाली आहेत. सर्व पोलीस कामावर रुजू झाले आहेत. मात्र जेंव्हा बांगलादेशातील मुळापासून सर्व सुधारणा पूर्ण होतील, तेंव्हाच मुक्त वातावरणातील आणि पारदर्शक निवडणुका घेतल्या जाऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.
देशातील यंत्रणांच्या फेरउबारणीसाठी मुख्य सल्लागार डॉ. युनूस यांनी काही देशांची मदत मागितली आहे. त्यामुसार ब्रिटन आणि जपानच्या बांगलादेशातील उच्चायुक्त णि दूतांनी हंगामी सरकारला मदत करण्याची ग्वाही दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.