#ICCWorldCup2019 : धोनी-राहुलची शतकी खेळी; बांगलादेशसमोर 360 धावांचे लक्ष्य

लंडन – विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात केएल राहुल आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं बांगलादेशसमोर 360 धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 50 षटकामध्ये 7 विकेट गमावून 359 धावांचा डोंगर उभारला.

एमएस धोनीने 78 चेंडूत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 113 धावांची शतकी खेळी साकारली तर राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी केली. भारताचे सलामीवीर फलंदाज पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही अपयशी ठरले. रोहित शर्मा 19 तर शिखर धवन 1 धावांवर बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने 46 चेंडूत 47 धावा केल्या तर अष्टपैलू खेळाडू विजय शंकर 2 धावांवर माघारी परतला. बांगलादेशच्या गोलंदाजानी 30 अतिरिक्त धावा दिल्या, यामध्ये 26 वाईड आणि 1 नो बाॅल चा समावेश आहे.

बांगलादेशकडून गोलंदाजीत रूबेल हुसैन आणि शाकिब अल हसन याने 2 गडी बाद केले, तर सब्बीर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन आमि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here