#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय

कार्डिफ – विश्वचषक स्पर्धेत आज यजमान इंग्लंड संघाचा तिसरा सामना बांगलादेशविरूध्द रंगणार आहे. मागील सामन्यात पाकिस्तान विरूध्द झालेल्या पराभवामुळे इंग्लंडचा संघ आजच्या सामन्यात विजयाच्या इराद्याने उतरणार आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडकडून दुसऱ्या सामन्यात हार स्विकारावी लागल्यानंतर बांगलादेशसुध्दा आजच्या सामन्यात विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशने जिंकला आहे. बांगलादेशचा कर्णधार मशरफे मुर्तजा याने प्रथम गोलंदाजी स्विकारली असून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

इंग्लंड संघ –

जेसन रॉय, जॉनी बेयर्सटो, जो रूट, इयोन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, क्रिस वोक्स, लियाम प्लंकेट, जोफ़्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वुड

बांगलादेश संघ –

तमीम इक़बाल, सौम्य सरकार, शाकिब अल हसन, मुशफ़िकुर रहीम, मोहम्मद मिथुन, महमूदुल्लाह, मोसद्दक हुसैन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहंदी हसन, मशरफे मोर्तज़ा, मुस्तफ़िज़ुर रहमान

https://twitter.com/cricketworldcup/status/1137288128761405440

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.