बांगलादेशने भारताबरोबरची सीमा बंदी 14 दिवसांनी वाढवली

ढाका – भारतातील कोविडची परिस्थिती लक्षात घेता सीमेवरील बंदी आणखी 14 दिवस वाढविण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला आहे. शनिवारी ढाका येथे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 26 एप्रिल रोजी बांगलादेश सरकारने भारताशी असलेली सीमा 14 दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. तथापि, सीमावर्ती मार्गाने मालवाहतूक सुरू ठेवली गेली होती.

दरम्यान, ढाका येथे घेण्यात आलेल्या नमुना चाचणीत बांगलादेशात भारतीय करोना स्ट्रेन पहिल्यांदाच आढळून आला आहे. भारतातून बांगलादेशात गेलेल्या दोन जणांकडून 29 एप्रिल रोजी हे नमुने घेण्यात आले होते. देशातील प्रमुख संशोधन संस्थांना यासंबंधीचा डाटा पाठवून देण्यात आला असून भारतीय स्ट्रेनचा संदर्भ लक्षात घेऊन बांगलादेशातील करोना रुग्णांच्या नमुन्यांबाबत पडताळणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे बांग्लादेश इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी, रोग नियंत्रण आणि संशोधन (आयईडीसीआर) च्या प्रमुख वैद्यकीय संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.

शनिवारी बांगलादेशात 45 मृत्यू आणि 1285 ताज्या करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या संसर्गाची एकूण संख्या 7.72 लाखांवर गेली आहे आणि मृतांचा आकडा 11,878 वर पोहोचला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.