#U19CWC : द.आफ्रिकेवर मात करत बांगलादेश उपांत्य फेरीत दाखल

पाॅटचेफस्ट्रूम : तजनीद हसन, शहादत होसैन, तौहिद हदय यांच्या अर्धशतकी खेळीच्या आणि रकीबुल हसनच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने यजमान दक्षिण आफ्रिका संघावर १०४ धावानी मात करून १९ वर्षाखालील गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना तनजीद हसनच्या ८०, शहादत होसैनच्या नाबाद ७४ आणि तौहिद हदयच्या ५१ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ५ बाद २६१ अशी मजल मारली होती. द.आफ्रिकेकडून फेकू मोलेत्सने याने २ तर तियें वन वूरेंने १ गडी  बाद केला.

त्यानंतर विजयासाठी २६२ धावांचा पाठलाग करताना द.आफ्रिकेचा डाव ४२.३ षटकांत अवघ्या १५७ धावांवर संपुष्टात आला. द.आफ्रिकेकडून लुका बेअौफोर्टने सर्वाधिक ६० तर जानथन बर्डने ३५ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून रकीबुल हसनने १९ धावा देत सर्वाधिक ५ गडी बाद केले. तंजीम हसन शाकिबने २ तर शमीम होसैन आणि शोरिफुल इस्लामने प्रत्येकी १ गडी बाद केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.