नाणेफेक जिंकून बांगलादेशचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

नागपूर : भारत-बांगलादेश दरम्यान तीन टी-२० सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभव विसरून कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने राजकोटमधील दुस-या सामन्यात धडाक्यात पुनरागमन केले व मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आज होत असलेल्या तिस-या आणि निर्णायक सामन्यात विजय संपादीत करून मालिका आपल्या नावे करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागलेला अाहे. बांगलादेशने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारून भारतीय संघास फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. क्रुणाल पांडयाऐवजी संघात मनीष पांडेला संधी देण्यात आली आहे.

दरम्यान दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर भारतीय संघाच्यी सुमार कामगिरीवर प्रचंड टीका झाली. त्यानंतर राजकोट येथील दुस-या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे संघाने विजय संपादित करत मालिकेत बरोबरी साधली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.