दुबई – सलामीवीर देवदत्त पदिक्कल, अॅरोन फिंच आणि एबी डि विलियर्स यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राॅयल चॅलेंजर बेंगळुरूने मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी 202 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Innings Break!
Half-centuries from Finch (52), Padikkal (54), ABD (55*) and a quick-fire 27* from Dube propels #RCB to a total of 201/3.
Will the #MumbaiIndians chase this down?#RCBvMI #Dream11IPL pic.twitter.com/AZh2K1mO3H
— IndianPremierLeague (@IPL) September 28, 2020
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षण स्विकारताना रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. त्यानंतर फिंच आणि देवदत्त पदिक्कल यांनी पहिल्या विकेटसाठी 9 षटकांत 81 धावांची भागिदारी केली. अॅरोन फिंच 35 चेंडूत (1 षटकार व 7 चौकार) 52 धावा काढून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेला विराट कोहली मोठी खेळी करू शकला नाही. विराट 11 चेंडूत 3 धावा काढून बाद झाला. त्यानंतर देवदत्त आणि एबी डि विलियर्सने खेळाची सूत्रे हाती घेत संघाची धावसंख्या 150 पार नेली.
17.1 षटकांत संघाची धावसंख्या 154 असताना देवदत्त बाद झाला. त्याने 40 चेंडूत (2 षटकार व 5 षटकार) 54 धावा केल्या. त्यानंतर एबी डी विलियर्स आणि शिवम दुबे यांनी फटकेबाजी करत 20 षटकांत 3 बाद 201 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. एबी डी विलियर्सने 24 चेंडूत (4 चौकार व 4 षटकार) नाबाद 55 आणि शिवम दुबेने 10 चेंडूत (1 चौकार व 3 षटकार) नाबाद 27 धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीत ट्रेंट बोल्टने 4 षटकांत 34 धावा देत 2 तर राहुल चहरने 4 षटकांत 31 धावा देत 1 गडी बाद केला. जेम्स पॅटिसन (4 षटक 51 धावा), जसप्रीत बुमराह (4 षटक 42 धावा), क्रुणाल पांड्या (3 षटक 23 धावा) आणि कायरन पोलार्ड (1 षटक 13 धावा) या गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला ऩाही.