प्रेमाची परिभाषा सांगणारा  ‘ लव मी ’ अल्बम प्रदर्शित 

बंदिगी कालरा आणि पुनीष शर्मा मुख्य भूमिकेत

प्रेमाची परिभाषा सांगणारा ‘ लव मी ’ अल्बम नुकताच प्रदर्शित झाला असून बंदिगी कालरा आणि पुनीष शर्मा हे कलाकार या अल्बममध्ये आपणाला पाहवयास मिळतील. या अगोदर हे दोन कलाकार बिग बॉसच्या ११ व्या भागात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मीत बंधू आणि खुशबू गरेवाल यांनी यातील गीतांना त्यांचा आवाज दिला आहे. या अल्बममध्ये पहिल्याच भेटीत बंदिगी व पुनीष हे  दोघे कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात असे दाखवण्यात आले असून या अल्बममध्ये बंदिगी व पुनीष यांची भन्नाट केमिस्ट्री जुळली आहे.

‘लव मी’ अल्बमचे संगीतकार मीत बंधू असून दिग्दर्शक विष्णुदेवा हे आहेत. आर.डी.हे कॅमेरामन आहेत तर मीत एन्टरटेन्मेंट आणि मिखिल चंदिरामानी निर्माते आहेत. डाॅ.त्वचा हे सहनिर्माता आहेत.आगामी काळात अजून दर्जेदार अल्बमचा नजरा रसिकांना पाहवयास मिळेल असे ‘लव मी’ या अल्बमच्या टीमव्दारे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)