Bangladesh Vs West Indies 2nd Test (Kingston) : बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 101 धावांनी पराभव करून 15 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. विजयासाठी 287 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा 185 धावांवरच आटोपला.
यासह बांगलादेशने 2009 नंतर प्रथमच कॅरेबियन भूमीवर विजय मिळवला. अँटिग्वा येथील पहिल्या कसोटीत मोठ्या पराभवानंतर पाहुण्या संघाने शानदार पुनरागमन केले आणि या विजयासह बांगलादेशी संघाने 2 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली आहे. पहिल्या सामन्यात संघाला 201 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता 8 डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
मंगळवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने 5 बाद 193 या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि आणखी 75 धावा जोडताना सर्वबाद 268 धावा करत वेस्ट इंडिजला 287 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 185 धावांत सर्वबाद झाला. पहिल्या डावात एक बळी घेणाऱ्या तैजुल इस्लामने दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. तर, जॉयडेन सिल्स मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. वेस्ट इंडिज-बांगलादेश कसोटी मालिकेचा WTC फायनलच्या शर्यतीवर कोणताही परिणाम झालेला नाही. कारण दोन्ही संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
संक्षिप्त धावफलक –
बांगलादेश पहिला डाव : 164/10(71.5 षटक)
Shadman Islam64 (137), Mehidy Hasan Miraz 36 (75), Jayden Seales 4/5 (15.5), Shamar Joseph 3/49 (15)
वेस्टइंडिज पहिला डाव : 146/10(65 षटक)
Keacy Carty 40 (115), Kraigg Brathwaite 39 (129),Nahid Rana 5/61 (18),Hasan Mahmud 2/19 (11)
It all comes to an end at Sabina Park.
The #MenInMaroon retain the series trophy with the series leveled 1-1.#WIvBAN #WIHomeForChristmas pic.twitter.com/Whe5guLWM4
— Windies Cricket (@windiescricket) December 3, 2024
बांगलादेश दुसरा डाव : 268/10(59.5 षटक)
Jaker Ali 91 (106),Shadman Islam 46 (82),Kemar Roach 3/36 (10),Alzarri Joseph 3/77 (15.5)
वेस्टइंडिज दुसरा डाव : 185/10(50 षटक)
Kavem Hodge 55 (75),Kraigg Brathwaite 43 (63), Taijul Islam 5/50 (17), Hasan Mahmud 2/20 (6)