पाॅटचेफस्ट्रूम : बेखम वीलर ग्रीनआॅल याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बांगलादेशसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले आहे.
ICC U19 Cricket World Cup South Africa 2020
Semi-FinalBangladesh U19 need 212 runs to win#BCB #BANU19vNZU19 pic.twitter.com/76M7jy1yPI
— Bangladesh Cricket (@BCBtigers) February 6, 2020
बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २११ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बेखम वीलर ग्रीनआॅल याने सर्वाधिक नाबाद ७५(८३) धावांची खेळी केली. निकोलस लिडस्टोनने ४४(७४), फर्गस लेलमैनने २४(५०) आणि ओली वाईटने १८(४३) धावांची खेळी केली.
In tough circumstances Beckham Wheeler-Greenall has looked in fine form.
His second 50 of the 2020 #U19CWC 👏 #NZvBAN | #FutureStars pic.twitter.com/3dnsA5HrdD
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 6, 2020
बांगलादेशकडून शोरिफुल इस्लामने १० षटकात ४५ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. शमीम होसैन आणि हसन मुरादने प्रत्येकी २ तर रकीबुल हसन याने १० षटकात ३५ धावा देत १ गडी बाद केला.