शॉर्ट व्हिडिओ मेकिंग, शेयरिंग अॅप टिकटॉक भारतभर चांगलच लोकप्रिय झालं होतं. मात्र, भारत सरकारने टिकटॉक, हेलोसह 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे, पण टिकटॉक नाही म्हणजे तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवू शकत नाही असं नाही. टिकटॉकला पर्याय असे अनेक भारतीय अॅप्स उपलब्ध आहेत आणि भारतीय नागरिकही या अॅप्सना पंसती देत आहेत. अशाच सहा अॅप्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
(1) चिंगारी(Chingari) – टिकटॉक ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने काम करणारे चिंगारी अॅप भारतातील एका कंपनीने विकसित केले आहे. भारतीय नागरिकांत हे अॅप वेगाने लोकप्रिय होत असून रोज डाऊनलोड करणाऱ्यांच्या संख्येत 400 टक्क्यांनी वाढ होत आहे. याच्या माध्यमातून व्हिडीओ डाऊनलोड करता येतात किंवा अपलोड करता येतात. त्याचबरोबर मित्राशी व्हिडीओ संवाद साधता येतो.
(2) मित्रों (Mitron )- हे अॅप एकदम टिकटॉक प्रमाणेच आहे. याचे सारे फंक्शनही त्याच्यासारखेच आहेत. तुम्ही हे अॅप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही हे स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करून वापरू शकता. हे पूर्णपणे फ्री डाऊनलोड करू शकता.
(3) रोपोसो (Roposo) – गुडगाव येथे मुख्यालय असलेल्या ग्लान्स इनमोबी या कंपनीने रोपोसो नावाचे अॅप टिकटॉकला पर्याय म्हणून उपलब्ध केले आहे. गेल्या काही आठवड्यात या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे.यामध्ये तुम्ही वॉईस ओव्हर, म्युझिक, व्हिडीओ, फोटो असं सर्व एकत्रित एडिट करून टाकू शकता.
(4) वुई लाईक (WeLike )- टिकटॉकला पर्याय म्हणून वुई लाईक हे अॅपही प्रचलित आहे. या अॅपचे संचालक सिद्धार्थ वेंकटरामन यानी सांगितले की, आमच्या अॅमध्ये व्हिडीओसह अनेक मूल्यवर्धित सुविधा उपलब्ध आहेत. फोटो,, व्हिडीओ, आर्टिकल शेअर करू शकतात.
(5) यो प्ले(YoPlay) – मुंबईतील एका कंपनीने योप्ले हे अॅप विकसित केले आहे. यावरून व्हिडीओ तर डाऊनलोड होतो. त्याचबरोबर तो इतर समाज माध्यमावर टाकता येऊ शकतो. यात व्हिडीओ संपादित करण्याची सुविधा आणि संगीताचा पर्याय उपलब्ध आहे.
(6) बोलो इंड्या (Bolo Indya)- गुरूग्राममधील सिनर्जी बाईट इंडियाने बोलो इंड्या हे अॅप उपलब्ध केले आहे. मराठीसह भारतातील अनेक भाषांत हे अॅप उपलब्ध आहे. यात संगीताबरोबर अनेक विषयावरील व्हिडीओ अपलोड आणि डाऊनलोड केले जाऊ शकतात. जर यातील कंटेन्ट दर्जेदार असेल तर ग्राहकाला पैसे मिळतात, असे या कंपनीने म्हटले आहे.