#INDvNZ : सुपर ओव्हरवर बंदी लावणार

न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रांट राॅबर्टसन यांचे मजेशीर ट्विट

हॅमिल्टन : न्यूझीलंड संघाला बुधवारी तिस-या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडला यापूर्वीही अशा सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळेच त्यांचे क्रीडा मंत्री ग्रांट राॅबर्टसन यांनी या सुपर ओव्हरवरच बंदी घालणार असल्याचे ट्विट केले. मात्र, त्यांनी हे ट्विट केवळ गंमत म्हणून केले असून त्यावर नेटक-यांनी खूप लाईक्स दिल्या आहेत.

भारताविरूध्दच्या सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवाने संपूर्ण देशवासीय निराश झाले असून संघाला सुपर ओव्हरमध्ये सातत्याने असे पराभव का पत्कारावे लागतात अशा शब्दात क्रीडामंत्री ग्रांट राॅबर्टसन यांनी आपली निराशा व्यक्त केली. सुपर ओव्हरवर बंदी आणणारा प्रस्तावच आपण दाखल करणार असल्याचे त्यांनी थट्टेने सांगितले आहे.

इंग्लंडमध्ये जुलैमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही संघाला अपयश आले होते, त्यावेळीही सुपर ओव्हर भोवली होती. भारताने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची ऐतिहासिक कामगिरीही केली आहे. न्यूझीलंडमध्ये मानसिक आरोग्य आणि भल्यासाठी तत्काळ एक विधेयक ( सुपर ओव्हरवर बंदी आणणारे विधेयक) आणण्यात येईल. टाय झालेल्या सामन्यांमधील न्यूझीलंडची कामगिरी चांगली झालेली नाही. त्यांना ८ टाय सामन्यांत सुपर ओव्हरमध्ये ७ पराभव स्विकारावे लागले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.