रामनवमी, हनुमान जयंती मिरवणुकांना बंदी

महापालिका आयुक्‍तांच्या सूचना

पुणे – एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील रामनवमी, महावीर जयंती तसेच हमुमान जयंतीला शहरात मिरवणूक काढण्यास तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे.

याबाबतचे आदेश महापालिका आयुक्‍तविक्रम कुमार यांनी मंगळवारी काढले आहेत. बुधवारी रामनवमी असून, येत्या 25 एप्रिल रोजी महावीर जयंती तर 27 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. शहरातील करोनाची स्थिती पाहता या तीनही उत्सवांसाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली असून, ती पुढीलप्रमाणे.

अशा आहेत सूचना
* हे तीनही सण, उत्सव घरी साधेपणाने साजरे करावेत
* करोना रोखण्याच्या दृष्टीने मंदिरांत भजन, कीर्तन, पठण अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.
* मंदिराचे विश्‍वस्त, व्यवस्थापन यांनी भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी.
* देव-देवतांच्या उत्सव, जयंतीनिमित्त कोणतीही मिरवणूक, प्रभात फेरी काढू नये.
* सर्व मंदिराच्या ठिकाणी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.