डोपिंग प्रयोगशाळेवरील बंदी अन्यायकारक

नवी दिल्ली – राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळा (एनडीटीएल) ही पूर्णपणे जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेच्या (वाडा) नियमांप्रमाणे तयार झाली असल्याने त्यावर घालण्यात आलेली बंदी लवकर उठवली गेली पाहिजे. जर वाडाच्या कक्षेखाली आल्यानंतरही बंदी मागे घेतली जात नसेल तर ते अन्यायकारक आहे असेच म्हणावे लागेल, असेही क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले.

पुढील वर्षी जपानमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी “वाडा’ने दिलेल्या निर्देशांनुसार सर्व पात्रता स्पर्धांमध्ये खेडाळूंची डोपिंग चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीनंतरच खेळाडूंना संघनिवडीसाठी विचारात घेतले जाईल, असेही रिजीजू म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.