नवी दिल्ली – चीनसह अन्य राष्ट्रांतून आयात केलेल्या वस्तूंच्या लष्कराच्या भांडारामध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्याच्या प्रक्रियेवर संरक्षण मंत्रालयाने बंदी घातली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतून स्थानिक वस्तू घेण्याला चालना देण्यासाठी ही योजना आखली आहे.
कॅंटिन स्टोअर विभागाकडून विकल्या जाणाऱ्या अनेक आयात वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे. त्याचाच हा भाग आहे, असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
सियाचीनच्या पर्वतीय क्षेत्रापासून निकोबार बेटांपर्यंत साडेतीन हजार भांडार असणारी ही देशातील सर्वात मोठी साखळी आहे. या भांडारातून जवळपास पाच हजार वेगवेगळ्या वस्तूंची विक्री केली जाते. त्यात 400 वस्तू आयात केल्या जातात. त्यात प्रामुख्याने चिनी बनावटीच्या वस्तूंची संख्या अधिक आहे. टॉयलेट ब्रश, डायपर पॅंट, कुकर, इलेक्ट्रिक किटली, सॅंडविच स्टोअर्स, व्हॅक्युम क्लिनर, गॉगल्स आदीचा समावेश आहे.
या आयात वस्तूंच्या बदल्यात आता भारतीय वस्तू ठेवण्यात येणार आहेत. परदेशातून येणारी मद्यावरही आयात बंदी घालण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांश कॅंटीनमध्ये हे मद्य उपलब्ध होत नाही.