‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली

नवी दिल्ली : उत्तेजक पदार्थ सेवन चाचणीमध्ये बाद ठरल्याने गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन तर्फे घालण्यात आलेल्या तात्पुरत्या बंदीच्या शिक्षेमधून अखेर आज के संजीता चानू या भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूची सुटका झाली. कॉमन-वेल्थ स्पर्धांमध्ये दोनवेळा सुवर्ण पदकाची कामगिरी करणाऱ्या चानूला आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन तर्फे बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठा दिलासा भेटला आहे.

के संजीत चानू हिच्यावरील बंदीबाबत आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या कायदेविषयक सल्लगार इव्हा नाइरफा यांनी नॅशनल वेटलिफ्टिंग फेडरेशनला पाठविलेल्या ईमेल मध्ये, “के संजीता चानू या वेटलिफ्टिंग खेळाडूवरील बंदी आज (दिनांक २२) पासून उठविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनकडून येत्या काही दिवसांमध्ये या प्रकरणातील सुनावणीबाबतची संपूर्ण माहिती उघड केली जाईल.” अशी माहिती दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्पूर्वी, अमेरिकेमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेपूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उत्तेजक पदार्थ सेवन चाचणीमध्ये २५ वर्षीय संजीता चानू ही सदोष आढळल्याने मे २०१८ पासून तिच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)