…तर बाळासाहेबांनी ‘हे’ खपवून घेतले नसते – फडणवीस

कोल्हापूर – जे सरकार विश्वासघाताने तयार झालं त्याने शेतकऱ्यांचा विश्वासघातच केल्याची टीका माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. तसंच राज्य सरकारच्या विरोधात लवकरच रस्त्यावर उतणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते कोल्हापूरात बोलत होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सरकार विरोधात हल्लाबोल केलाय. नागपुरात नुकतच झालेलं हिवाळी अधिवेशन म्हणजे नुसती औपचारिकता आहे असं सांगत फडणवीस म्हणाले अधिवेशनात आम्ही उपस्थित कोणत्याही विषयावर त्यांंनी चर्चा केली नाही. शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी या मागणीकडे ही त्यांनी दुर्लक्ष केले परंतुु आजही त्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी मिळाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. कर्जमाफीची घोषणा ही उधारीची घोषणा आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. हे निषेधार्थ असून हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, हा नागरिकता देणारा कायदा आहे काढून घेणारा नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसंच मी बघितलेले उद्धव ठाकरे ते नाहीत त्यामुळे मी नेहमी भाजपची पालखी वाहणार नाही म्हणाले बाळासाहेब असते तर हे खपवून घेतले नसते, असे टीकास्त्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोडलं. सगळ्या परिमाणात आमच्या राज्याची स्थिती चांगली आहे. राज्याची घडी नव्या सरकारच्या हातात दिली त्यावेळी राज्यावर 15.8 टक्के कर्ज होते, आमच्या राज्यात इतर राज्यांपेक्षा चांगली स्थिती असं फडणवीस यांनी यावेळी केेलंय.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलेल्या टीकेला शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काय उत्तर देते हे पाहावं लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.