आजची शिवसेना पाहून बाळासाहेबांना दु:ख झाले असते -गिरीराज सिंग

मुंबई : निवडणुकीचे निकाल लागून पंधरा दिवसांपेक्षाही जास्त दिवस झाले आहेत. परंतू, राज्यात अजूनही कोणत्या पक्षाला स्थिर सरकार स्थापन करण्यात यश आले नाही. त्यातच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा एक फोटो ट्‌विट केला आहे. आज शिवसेनेला हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या पक्षांसोबतप जात असल्याचं पाहताना बाळासाहेबांना दु:ख झालं असतं, असं ते म्हणाले.

शिवसेनेला हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या पक्षांसोबतप जात असल्याचे पाहताना बाळासाहेबांना आणि शिवसैनिकांना दु:ख झाले असते. बाळासाहेबांनी सर्वांना एकजुट केले आणि काहींनी सर्वांना वेगळे केले याची इतिहास साक्ष देईल, असे सिंग यांनी आपल्या ट्‌विटमध्ये नमूद केले. शिवसेना आणि भाजपानं युतीमध्ये निवडणुका लढवल्या होत्या. तसेच शिवसेना-भाजपा युतीला बहुमतही मिळालं होतं. परंतु शिवसेना अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि समसमान सत्तावाटपाच्या आपल्या मागणीवर ठाम होती. त्यातच भाजपानं शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर त्यांची युती तुटली.

24 ऑक्‍टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. दिवसांनंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याची शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे. तसंच यापूर्वीच भाजपानं आपण सरकार स्थापन करू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)