कॉंग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेले कॉंग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. गटनेत्याची निवड न केल्यामुळे कॉंग्रेसला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. सर्वच पक्षांनी आपल्या गटनेत्यांची निवड विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच केली होती. परंतु, त्यासाठी कॉंग्रेसने सुमारे एक महिन्यांहून अधिक काळ घेतला.

भाजपने आपल्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची, शिवसेनेने एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीने सुरुवातीला अजित पवार यांची निवड केली होती. परंतु, अजित पवार यांनी भाजपबरोबर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आपला गटनेता बदल जयंत पाटील यांची त्यावर नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीला भाजप आक्षेप घेत आहे तर विरोधकांकडून पाटील हेच गटनेते असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हा प्रश्न अजून प्रलंबित आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.