बाळासाहेबांनी मोठ्या मनाने काँग्रेसला पाठिंबा दिला होता – रोहित पवार

मुंबई – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 7 वा स्मृती दिन आहे. याचपार्श्‍वभूमीवर राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यातच  कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीही फेसबुक पोस्टद्वारे बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

रोहित यांनी फेसबुक पोस्टमधून बाळासाहेबांनी मोठ्या मनाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं सांगितलं, तसेच प्रणब मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांनाही खुल्या मनाने राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला होता, याची आठवण करुन दिली. महाराष्ट्राचं हित लक्षात घेऊनच बाळासाहेबांनी कार्य केल्याचं रोहित यांनी म्हटलं. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, शिवसेनेची भूमिका बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरून असल्याचंच दर्शविण्याचा प्रयत्न रोहित यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.