प्रादेशिक अस्मितेचा हुंकार मिरवणारा मराठी माणूस बाळासाहेबांनी उभा केला : शरद पवार

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिवादन केले आहे. शरद पवार यांनी बाळासाहेबांचा फोटो ट्विट करून प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानानं मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला, असे म्हटले आहे.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन असून, शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली राज्यभरातून लोक येत आहे. तर सोशल मीडियातूनही बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!,असे शरद पवार यांनी अभिवादन करताना म्हटले आहे.

शरद पवार यांच्याबरोबरच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन,असे ट्विट गडकरी यांनी केले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. फडणवीस यांनी ट्विटरवरून बाळासाहेबांविषयी मनोगत व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.