कराड उत्तरला बाळासाहेबच आमदार : खा. कोल्हे

मसूर  – सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, हे दाखवून देण्याची वेळ आली असून यामध्ये कराड उत्तर अग्रेसर असेल. कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील हेच आमदार होतील, असा विश्‍वास खा. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

मसूर, ता. कराड येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सारंग पाटील, मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार जगदाळे, अजितराव पाटील-चिखलीकर, देवराज पाटील, शहाजीराव क्षीरसागर, संपतराव जाधव, चंद्रकांत जाधव, हेमंत जाधव उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना नेहमी अडचणीत आणण्याचा प्रयत्न महायुतीच्या शासनाने केला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या या सरकारला घरी बसविण्यासाठी मतदारांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे. बाळासाहेब पाटील म्हणाले, शेतकरी, युवक व महिला यांच्या हिताचा सातत्याने विचार करणारे महाआघाडीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नांची बाजी लावावी. आभार नंदकुमार जगदाळे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.