राजपुर आश्रमशाळेत बालआनंद मेळावा उत्साहात

मंचर – राजपूर (ता. आंबेगाव) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी बालआनंद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जादूगार प्रकाश शिरोळे यांनी जादुचे प्रयोग सादर केले, अशी माहिती मुख्याध्यापक विठ्ठल नरसाळे यांनी दिली.

कार्यक्रमास केंद्रप्रमुख चिमा बेंढारी, मुख्याध्यापक विठ्ठल नरसाळे, संजय ढमढेरे, राजाराम भागवत, किरण शेंगाळे, मनोहर केंगले, पांडुरंग भवारी, उषा असवले, अंगणवाडी मदतनीस लीलाबाई लोहकरे, विनायक लोहकरे यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मेळाव्याचे आयोजन कथामाला प्रमुख कार्यवाह शामराव कराळे,मार्गदर्शक संजय डुंबरे,कार्यवाह चांगदेव पडवळ,कोषाध्यक्ष संतोष गडगे यांच्या सहकार्यातून करण्यात आले. मेळावा यशस्वी होण्यासाठी शिक्षक सचिन लांडे, दादाराव गव्हाणे, सुनिता सातपुते, अक्षय कोकाटे यांनी परिश्रम घेतले. स्वागत व सूत्रसंचालन शिक्षक भागवत भंगे यांनी केले. कथामाला कार्यकारी सदस्य संतोष थोरात यांनी आभार मानले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.