#व्हिडीओ : भारतीय वायुसेनेकडून बालाकोट हवाई हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध

वायुसेना प्रमुखांनी दिली एअरस्ट्राईकची सविस्तर माहिती

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेकडून बालाकोट हवाई हल्ल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारताने बॉम्बस्फोट करून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले आहेत. पुलवामा येथील सीआरपीएफच्या छावण्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी तळांना नष्ट करण्यात आले. शुक्रवारी भारतीय वायुसेनेचे नवे प्रमुख राकेश कुमार सिंग भदोरिया यांनी पत्रकार परिषदे घेतली. त्यावेळी बालाकोट एअरस्ट्राईकचा प्रमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये बालाकोट एअरस्ट्राइकचे दृश्‍य आहेत.

पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून हवाई दलाने बालाकोट येथे हवाई हल्ला करण्याची योजना आखली. त्यानंतर एअरफोर्सच्या विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश दहशतवादी तळांना लक्ष्य करुन ते नष्ट केले.

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरात हवाई हल्ला केला होता. जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 सैनिक ठार झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. पाकिस्तान-आधारित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या संघटनेने जबाबदारी घेतली होती. यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानहून एअरफील्डमध्ये प्रवेश करत असताना, खैबर पख्तूनख्वा मधील जैश दहशतवादी तळ तोडून टाकले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.