‘हाऊसफुल ४’ चित्रपटातील अक्षयचे ‘बाला’ गाणे प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई – बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी हाऊसफुल 4 चित्रपटातील बाला हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यावर अक्षय कुमारने चांगलाच ताल धरलेला पहायला मिळत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हे गाण प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सध्या हे गाण चांगलच व्हायरल होताना पहायला मिळत आहे. अक्षयने त्याच्या ट्विटरवरून हे गाणे शेअर केले आहे.

त्याने ट्विट करत म्हटले आहे की ‘फाइनली बाला का इंतेजार खत्म’. शैतान का साला हाजिर है, असे कॅप्शन देत त्याने या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या दोन मिनिटांच्या गाण्यामध्ये अक्षय कुमार पारंपारिक वेशभूषेत पहायला मिळत आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार दुहेरी भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी पहायला मिळणार आहे. अभिनेता रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे, बोमण इराणी, क्रिती खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत. 25 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.