मुंबई – अमर कौशिक दिग्दर्शित ‘बाला’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईकडे वाटचाल सुरू केली आहे. या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराणा, अभिनेत्री भूमि पेडणेकर, अभिनेत्री यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 8 नोव्हेंबरला बाला’ सिनेमा रिलीज होताच बॉक्स ऑफिस वरती चित्रपटाने छाप टाकली आहे. देशभरात तीन हजार स्क्रीनवरती हा सिनेमा प्रदर्शित केला गेला आहे.
#Bala has an excellent Day 1… Strong word of mouth + Brand Ayushmann are key contributors… Expect biz to grow further on Day 2 and 3… Fri ₹ 10.15 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) November 9, 2019
प्रेक्षकांची सिनेमाला चांगली पसंती मिळताना दिसत आहे. ‘कॉमेडी’ आणि ‘ड्रामा’ सोबतच या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना चांगला संदेश देण्यात आला आहे. ‘ड्रीम गर्ल’ नंतर ‘बाला’ सिनेमासाठी चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळाली. या सिनेमाने शनिवारी 15.50 करोड़ रुपये एवढी कमाई केली. ‘ड्रीम गर्ल’ नंतर ‘आयुष्मान खुराणा’ चा ‘बाला’ सिनेमा सुद्धा हिट ठरला आहे.