‘बजाज चेतक इलेक्‍ट्रिक भविष्यात इतिहास रचेल’

हमारा बजाजची चेतक इलेक्‍ट्रिक रुपात; आकुर्डी येथे चेतक इलक्‍ट्रिक यात्रेचे स्वागत

पिंपरी – वर्षानुवर्षे जनमानसाच्या मनावर गारुड घालणारी बजाज चेतक आता नव्या रंगरूपात आणि नवी वैशिष्ट्‌ये घेऊन समोर आली असून, बजाज चेतक आता चार्जिंगद्वारे रस्त्यावर धावणार आहे. बजाज चेतक हा ब्रॅंड भूतकाळात मैलाचा दगड ठरला आणि भविष्यातही इतिहास रचेल असा विश्‍वास बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी गुरुवारी आकुर्डी येथे व्यक्त केला. आकुर्डी येथे आयोजित या कार्यक्रमाला व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज उपस्थित होते. राजीव बजाज यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

नवी दिल्लीमध्ये 16 ऑक्‍टोबर 2019 रोजी चेतक ही इलेक्‍ट्रिकवर चालणारी दुचाकी सादर करण्यात आली होती. या कार्यक्रमात दिल्लीतून सुरू झालेल्या चेतक इलेक्‍ट्रिक यात्रेला रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी हिरवा झेंडा दाखविला होता. 20 चेतक रायड्‌स यांनी उत्तर आणि पश्‍चिम भारताचा 3000 किमी हुन अधिकचा प्रवास करत पुण्यापर्यंतचा टप्पा गाठला. 14 नोव्हेंबर 2019 रोजी पुण्यात पोहचण्याआधी हा ताफा दिल्ली ते आग्रा, जयपुर, उदयपुर, चितोड मधील चेतक स्मारक, अहमदाबाद , मुंबई, पणजी असा प्रवास करण्यात आला. आज (दि.14) आकुर्डी येथील प्लांट मध्ये बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी या चेतक इलेक्‍ट्रिक यात्रेचे स्वागत केले. जानेवारी 2020 पासून चेतक इलेक्‍ट्रिकचे बुकींग सुरु करण्यात येणार आहे.

व्यवसायात अप-डाउन येत राहतात – राजीव बजाज
जीएसटी आणि कमी कमी होत असलेली सबसिडी यामुळे प्रत्येक व्यवसायाची आर्थिक घडी विस्कटत आहे. हे एका अर्थी खरे असले तरी दुसरी बाजूही व्यावसायिकांनी पहावी. सरकारने अर्थव्यवस्थेत सुधारणा नक्कीच केल्या पाहिजेत. जागतिक मंदीची भारताला झळ पोहोचत असली तरी योग्य पावले टाकली तर ही अर्थव्यवस्था स्वत:च्या बळावर विकासाची गती वाढवू शकते. प्रत्येक व्यवसायात अप-डाउन येत राहतात मात्र त्यातून उभारी घेण्यासाठी व्यावसायिक, कंपन्या या प्रत्येकाने नवीन मार्केट, नवीन उत्पादन शोधणे गरजेचे झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)