‘लाख’मोलाची बजाज ‘चेतक’ लाँच!

भारतीय वाहन बाजारपेठेमध्ये एकेकाळी एकहाती सत्ता गाजवणारी बजाज ‘चेतक’ आता नव्या अवतारामध्ये पुन्हा एकदा ग्राहकांच्या भेटीला आली आहे. सध्या वाहन बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची चलती असल्याने नव्या जमण्याची बजाज चेतक देखील याला अपवाद नाहीये. बजाजने ‘चेतक’ इलेक्ट्रिक स्वरूपात रिलाँच करणार असल्याची अधिकृत घोषणा केल्यापासूनच इंटरनेटवर चेतकला मोठा प्रतिसाद मिळाला होता. असं असलं तरी येत्या १५ जानेवारीपासून ‘चेतक’च्या बुकिंगला सुरुवात होणार असल्यानं इंटरनेटवर मिळालेल्या प्रतिसादाचे विक्रीमध्ये रूपांतर होते का हे पुढील काही दिवसांमध्येच उघड होणार आहे.

दरम्यान, आज बजाजतर्फे ‘चेतक’ला ऑफिशियली लाँच करण्यात आलं असून या स्कुटरची किंमत १ लाख रुपयांपासून ते १.२५ रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. पुन्हा चार्ज करता येणाऱ्या बॅटरीवर चालणारी चेतक एका चार्जवर ९० किलोमीटरचे अंतर पार करेल असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. चेटकीची बॅटरी संपूर्ण चार्ज करण्यासाठी ५ तासांचा अवधी लागणार आहे.

बजाज चेतक खरेदी करण्याचा पहिला मान बंगळुरू व पुणेकरांना मिळाला असून बंगळुरू व  पुण्यातील बजाजच्या अधिकृत डिलर्सकडे इलेक्ट्रिक स्कुटर ‘चेतक’च्या बुकिंगला १५ जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे. कंपनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारतामध्ये ही स्कुटर विक्रीस उपलब्ध करून देणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.