पुणे : बनावट कागदपत्राद्वारे जमीन बळकावण्याच्या प्रकरणातील आरोपीला 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस. जोंधळे यांनी हा आदेश दिला आहे.
सचिन बाळासाहेब जागडे (वय 37, रा. कोंढवा) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. पुष्कर दुर्गे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत सचिन आयवळे (वय 40) यांनी बिबवेवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. 23 मार्च 2018 ते 25 डिसेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली.
सचिनसह पाच जणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार असताना त्याने पोलिसारवरच आरोप केले होते. दरम्यान पोलिसांनी सचिन याला अटक केली. सुरूवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयाने सचिन याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यावेळी त्याने ऍड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने तो अर्ज मंजुर केला.