परभणी : रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना सर्वोच न्यायालयाने दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याप्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत होते.
त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला आहे. 2019 मध्ये गंगाखेड विधानसभेची निवडणूक गुट्टे यांनी लढवली होती.
गुट्टे यांना 26 मार्च 2019 रोजी औरंगाबाद येथील सीआयडी पथकाने अटक रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबाद येथील सीआयडी पथकाने अटक करुन गंगाखेडच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले होते.
दरम्यान 2017 मध्ये परभणीच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड कारखान्याने 29 हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर सहा बँकाकडून तब्बल 328 कोटींचे कर्ज काढले होते.