Arvind Kejriwal Bail | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायलयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णायामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सीबीआयने त्यांना 26 जून रोजी कथित मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली होती. अरविंद केजरीवाल यांना 10 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी सर्वोच्च न्यायलयाकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत.
कोणत्या अटींचे करावे लागणार पालन?
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाहीत, या प्रकरणाशी संबंधित कोणतीही सार्वजनिक चर्चा करणार नाही, तपासात अडथळा आणण्याचा किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करतील. याशिवाय सरकारी फाईलवर सही करता येणार नाही, या अटींसह केजरीवाल यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मागील सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी अटकेला बेकायदेशीर ठरवत जामीन याचिका दाखल केली होती. याप्रकरणी 5 सप्टेंबर रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांनी केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडी प्रकरणात 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आणि आज केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात जामीन मिळाला. ते 177 दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही केजरीवाल यांना प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. Arvind Kejriwal |
आम आदमी पक्षाला होणार फायदा ?
हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. येथील सर्व 90 जागांवर एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. हरियाणात आम सर्व 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. अशा स्थितीत केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्याने प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे. केजरीवाल यांच्याकडे प्रचारासाठी जवळपास 25 दिवस असतील. Arvind Kejriwal |
हेही वाचा :
‘बेकायदा मशीद सील करणार’, मंडीतील हिंदू संघटनांच्या गदारोळानंतर उपायुक्तांचा निर्णय