पुणे – मेसर्स पुनावळे मेडिकलचा खोटा शिक्का आणि मागणी पत्राद्वारे औषधाची खरेदी केल्याप्रकरणात श्रीराम बालाजी रुपनर (थेरगाव, मूळ. हग्रंगा, ता. निलंगा, जि. लातुर) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही.मोहिते यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.
रुपनर याने ऍड. खंडेराव टाचले, ऍड. मनिष मगर आणि ऍड. शिवाजीराव देशमुख यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर हा निकाल दिला आहे.
वाकड पोलिसांनी ही कारवाई करत रुपनर याला अटक केली. अन्य दोघांवरही गुन्हा दाखल आहे. याबाबत भाग्यश्री यादव (वय 42, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्ह्यातील औषधाचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे औषध खरेदी करून मेसर्स कैलास इंटरप्रायझेस यांची आणि मेसर्स आरती फार्मा शिवाजीनगरची फसवणूक केली आहे. या प्रकरणात रुपनर याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला. त्यांनी तो मंजुर केला.