बेकायदेशीरपणे चरस बाळगल्याप्रकरणात जामीन

पुणे – बेकायदेशीरपणे 2 लाख 92 हजार 200 रुपयांचे चरस बाळगल्याप्रकरणात वानवडी पोलिसांनी अटक केलेल्याला विशेष न्यायाधीश व्ही.पी. अदोणे यांनी जामीन मंजुर केला आहे.
शादाब सलीम शेख (वय 34, रा. कोंढवा) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.

पोलिसांनी 23 नोव्हेंबर 2020 सायंकाळी 6.15 च्या सुमारास ही कारवाई करत शेख याला अटक केली. याबाबत पोलीस शिपाई प्रदीप गाडे यांनी फिर्याद दिली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना शेख याने जामिनासाठी अर्ज केला. त्याने यापूर्वी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्याला या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे.

न्यायालयाने घातलेल्या अटी, शर्तींचे पालन करण्यास तो तयार आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ऍड. पुष्कर दुर्गे यांनी केली. त्यानुसार पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत वानवडी पोलीस स्टेशनला हजेरी लावणे, तपासास सहकार्य करणे, न्यायालयीन सुनावणीच्या तारखांना नियमितपणे हजर राहणे, पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.