सोरतापवाडी (प्रतिनिधी): कोरेगाव मुळ (ता.हवेली) येथील जेनिथ वाईन्स या दुकानादाराला 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या मंगेश कानकाटे याला कोर्टाने जामिन मंजूर केला आहे .याबाबत दुकानाचे मालक विशाल मोहेकर यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात सहा जणांच्या विरुद्ध फिर्याद दिली होती.
मोहेकर यांचे बंधू सागर हे शुक्रवारी (दि 10 जुलै )रोजी दुपारी दुकानात बसले असताना तोंडाला रुमाल बांधलेला एक तरुण तेथे आला गोरख कानकाटे यांच्या कार्यालयातून फोन असल्याचे सांगून मोहेकर यांना फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकून बोलण्यास प्रवृत्त केले यावर मोहेकर यांनी फोन घेऊन कानाला लावला असता फोन मधून बोलणाऱ्या व्यक्तीने मोहेकर यांना या भागात धंदा करायचा असेल तर मंगेश कानकाटे याला २५ लाख खंडणी द्यावी लागेल नाहीतर ठार मारून टाकेल अशी धमकी दिली होती.
दुसऱ्या दिवशी (शनिवारी दि 11जुलै ) सकाळी खंडणीच्या पैशाचे काय झाले असे म्हणत सहा अनोळखी तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून हाता मधील लोखंडी रॉड लाकडी दांडकी कुऱ्हाडीच्या साह्याने दुकानात शिरून व्यवस्थापकाला मारहाण केली याबाबत विशाल मोहेकर यांनी लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात सहा जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी मंगेश कानकाटेसह अज्ञात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मंगेश कानकाटे याला अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याचा जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे अॅड. विजेंद्र बडेकर व अँड. सिध्दार्थ बाणे यांनी बाजू मांडली तर सरकार तर्फे सरकारी वकील अँड.पेठकर यांनी बाजू मांडली.