शेततळ्यामध्ये पडून तीन वर्षाच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणात शेतकऱ्याला जामीन

पुणे – शेततळ्यामध्ये पडून 2 वर्षे दहा महिन्याच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणात शेतकऱ्याला 15 हजाराचा जामीन सत्र न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी मंजुर केला. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. भादवी कलम 304 (सदोष मनुष्यवध) लागू होत नाही, त्यामुळे जामीन देण्याची मागणी ऍड. विरधवल प्रभाकर देशमुख यांनी केली.

बाळासो बाबुराव काकडे (रा. कोथळे, सोंडवस्ती, ता. पुरंदर) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. विरधवल देशमुख यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. 30 जून 2021 रोजी पुरंदर तालुक्‍यातील कोथळे, सोंडवस्ती येथे हा प्रकार घडला. काकडे याचे शेततळे आहे.

लहान मुल अथवा पोहता न येणाऱ्या व्यक्तीचा त्यामध्ये पडून मृत्यूचा धोका आहे, हे माहित असतानाही कम्पाऊंड करण्यात आले नाही. त्यामध्ये खेळत जावून पडल्याने राजवीर या बालकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणात काकडे याला जेजुरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.