पुणे – प्रेम प्रकरणातून संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा निष्क़र्ष काढत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात तरूणाला सत्र न्यायाधीश एस.पी.पोंक्षे यांनी जामीन मंजुर केला आहे. दर्शन ऊर्फ यश सतिश गायकवाड (वय 23, रा. भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. राकेश सोनार यांच्यामर्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
17 वर्षे 6 महिने वय असलेली पीडितेला पळून नेल्याप्रकरणात तिच्या पालकांनी 26 डिसेंबर रोजी स्वारगेट पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर 14 फेब्रवारी रोजी ती परत आली. त्यावेळी यश याने लग्नाच्या अमिषाने पळवून नेऊन अत्याचार केल्याचा जबाब तिने दिला.
त्यानुसार बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल होता. या प्रकरणात तीन दिवस विलंबाने एफआयआर दाखल झाली आहे. प्रेम प्रकरणातून संमतीनेच हे कृत्य झाल्याचा युक्तीवाद ऍड. राकेश सोनार यांनी केला. सोनार यांना ऍड. प्रमोद राठोड यांनी सहकार्य केले.