पुणे(प्रतिनिधी) – पिस्तुल बाळगल्याप्रकरणात चंदननगर पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजुर केला आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शेख यांनी हा आदेश दिला आहे.
बाळासाहेब उमाजी मदने (वय 30, रा. खराडी) आणि सुग्रीव भंडलकर (रा. खांडज, बारामती) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी अॅड. खंडेराव टाचले आणि अॅड. मनिष मगर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. खराडी येथे 1 डिसेंबर रोजी पोलिसांनी कारवाई करत दोन पिस्तुल, सहा काडतुसे आणि स्विफ्ट गाडी असा 3 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता.
चंदननगर पोलिसात महिलेने पतीच्या मारहाणीच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी तिने पतीकडे पिस्तुलातील गोळ्या असल्याची माहिती दिली. पोलिसांनी पतीकडे चौकशी करून हा गुन्हा उघडकीस आणला. तिच्या पतीसह दोघांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना दोघांनी जामिनासाठी अर्ज केला. त्याच्याकडे गावठी पिस्तुल मिळाले आहे. आर्म ऍक्ट 7/25 लागू होत नसल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे अॅड. खंडेराव टाचले आणि अॅड. मनिष मगर यांनी केला.