पुणे – बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तुल बाळगल्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे.
कुणाल नारायण जाधव (वय 22, रा. काळेपडळ) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. विराज बाबासाहेब करचे पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली होती.
या प्रकरणात आणखी एकाचा शोध पोलीस घेत आहेत. जाधव याला 16 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले. सुरूवातीला पोलीस कोठडी झाली. त्यानंतर न्यायालयीन कोठडी झाली असताना त्याने ऍड. विराज बाबासाहेब करचे पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. तो न्यायालयाने मंजुर केला.