2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या बाहूबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रिकॉर्ड प्रस्थापित केले. एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या “बाहूबली’ चित्रपट आतापर्यत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. बाहूबलीची संपूर्ण स्टार कास्ट पुन्हा एकदा रॉयल रीयूनियन करत आहे.
साउथचा सुपरस्टार प्रभासने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाहूबलीच्या स्टार कास्टसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात डायरेक्टर एसएस राजामौली, अनुष्का शेट्टी, राण दग्गूबती दिसत आहे. हा फोटो प्रभासने राजामौली यांच्या अकाउंटवरून रीपोस्ट केला आहे. रीपोस्ट करताना प्रभासने म्हटले की, हे एक रॉयल रीयूनियन आहे. तेही बाहूबलीच्या टीमसोबत. मी आपल्या बाहूबली चित्रपटाचा लाईव्ह अनुवाद पाहण्यासाठी खूप उत्सुक असून तो रॉयल अलबर्ट हॉन येथे होणार आहे.
दरम्यान, महेंद्र बाहूबली उर्फ अभिनेता प्रभास सध्या आगामी “साहो’ चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत झळकला आहे. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच प्रभास लवकरच राधा कृष्ण कुमार यांच्या “अमौरा’ चित्रपटात पूजा हेगडेसोबत काम करत आहे.