नाशिक- अभिनेता अभिजीत खांडकेकर याने वोकल फॉर लोकल साठी पुढाकर घेतला आहे. त्याने इंंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्यात दिवाळीसाठीचे कंदील विकणारा एक मुलगा आहे. नाशिकमधील हा फोटो आहे.
या फोटोत एक मुलगा दिवाळी निमित्त आकाशकंदील विकताना दिसतो आहे. तो मुलगा स्वत: कंदील हाताने तयार करुन त्याने दुकान लावले आहे. त्याच्या या मेहनतीची दखल अभिजीतने घेतली आहे.
नाशिकच्या रस्त्यावर एका हातगाडीवर रंगीबेरंगी लहान मोठे आकाशकंदील घेऊन हा निखिल स्वत; हाताने बनविलेले हे आकाशकंदील घेऊन नाशिककरांची दिवाळी प्रकाशमय करायला निघालाय. यंदाच्या दिवाळीत परदेशी बनावटीच्या वस्तू घेण्यापेक्षा आपापल्या शहरातील किंवा गावातील स्थानिक कलाकारांंनी , लघू उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेऊन त्यांचीही दिवाळी आनंददायी करुया, असं त्याने या पोस्ट मध्ये लिहीलं आहे.
आपल्या शहरातल्या लघू उद्योजकांबद्दल ह्या पोस्टवर किंवा तुमच्या सोशल मीडियावर नक्की लिहा, आपल्यासोबत सगळ्यांची दिवाळी तेजोमय करा, असं आवाहनही त्याने केलं आहे.